क्रीएटिव्ह इंग्लिश अकॅडमी जयसिंगपूर मध्ये इंग्लिश स्पिकिंग कोर्स सुरु
जयसिंगपूर (प्रतिनिधी) मातृभाषेचा अभिमान बाळगावा मात्र, ज्ञानभाषा इंग्रजी काळाची गरज असल्याने ती प्रत्येकाने आत्मसात करणे आवश्यक असल्याचे मत प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांनी क्रीएटिव्ह इंग्लिश अकॅडमी च्या उदघाटन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
काळानुरूप बदल स्वीकारणारेच स्पर्धेत टिकू शकतात. भाषेचा फाजील अभिमान न बाळगता शैक्षणिक दृष्टय़ा इंग्रजीचे जागतिक महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे. मराठीचा अभिमान असावा. चांगले मराठी येण्यासाठी अवांतर वाचनही असावे. मात्र, जगाची ज्ञानभाषा इंग्रजी असल्याने इंग्रजीचे महत्त्व नाकारून चालणार नाही. त्यासाठी इंग्रजी व मराठीचे रोज एक उत्तम वर्तमानपत्र वाचणे आवश्यक आहे. सद्यस्थितीला प्रत्येक क्षेत्रात संकुचित वृत्तीचे नेतृत्व बहुसंख्येने दिसून येते. युवावर्गाने प्रादेशिक, भाषक आणि धार्मिकवादात गुंतून न राहता शिक्षणाच्या माध्यमातून उत्कर्ष साधणे आवश्यक आहे, असेही प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांनी सांगितले.
क्रीएटिव्ह इंग्लिश अकॅडमीचे संचालक राज धुदाट यांनी मराठीचा वृथा अभिमान न बाळगता इंग्रजी काळाची गरज असून तिचा अभ्यास आवश्यक असल्याचे मत नोंदवले. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षाच नाकारल्याने स्पर्धा संपुष्टात आली असली तरी विद्यार्थ्यांनी ऐनवेळी अभ्यास करण्यापेक्षा नियमित अभ्यासावर भर द्यावा. विपरित परिस्थितीवर मात करून अनुकूल परिस्थिती निर्माण करणारा खरा हुशार असतो. जयसिंगपूरनी यापूर्वीही स्पर्धा परीक्षांमध्ये चुणूक दाखवली असून या यापुढे त्यांनी या क्षेत्रात बहुसंख्येने यश संपादन करणे आवश्यक असल्याचे राज धुदाट म्हणाले.
क्रीएटिव्ह इंग्लिश अकॅडमी जयसिंगपूरच्या वतीने ४५ दिवसाचा इंग्लिश स्पिकिंग कोर्स सुरु करण्यात आलेला आहे. सध्याच्या युगात इंग्रजी बोलता येणे गरजेचे असलेने तज्ञ मार्गदर्शकाच्या मार्गदर्शना खाली हा कोर्से आयोजित करण्यात आला असून, नांदणी नाक्या वरील माय स्कूल मध्ये १५ एप्रिल २०१२ ते ३० मे २०१२ या दरम्यान उत्सुकाना या सेवेचा अल्प शुल्कात लाभ घेता येईल. शहरातील हायस्कूल व महाविद्यालयातील विद्यार्थी, खाजगी व सरकारी कार्यालयातील कर्मचारी, गृहिणी, व्यापारी, आणी विविध उद्योगा मधील सर्वासाठी हा कोर्से उपउक्त आहे. सार्वजनिक समारंभ, मुलाखती, तसेच छोट्या मोठ्या मिटिंग साठी आवशक असणार्या दैनंदिन इंग्रजीची तयारी या कोर्से मधून करण्यात येईल.
त्याच प्रमाणे इयता दुसरी पासून दहावी पर्यंत च्या मुला - मुली साठी इंग्रजी करसीव्ह रायटिंग वर्ग आणी इंग्रजी ग्रामर वर्गाचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक क्लास साठी माफक शुल्क ठेवण्यात आले आहे. सोप्या पद्धतिने ग्रामरचे अध्यन, परीक्षेत येणारे सर्व ग्रामर, लेटर रायटिंग, स्टोरी रायटिंग, इत्यादी ची तयारी करून घेतली जाईल. इंग्रजी शब्द समूहाची योग्य वाढ करण्या साठी गोष्ठीची पुस्तके दिली जातील. इंग्रजी बोलण्याचा भरपूरसराव करून घेतला जाईल. महिलासाठी व नोकरदारा साठी स्वतंत्र वर्गाची सोय. इंग्रजी विषयाची आवड निर्माण करण्यासाठी डिजिटल बोर्ड व डिजिटल पेन चा वापर करणारी जयसिंगपूर मधील पहिली व एकमेव संस्था ही या अकॅडमीची काही ठळक वैशिष्टे आहेत.
तरी इच्छुकानी अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी ०२३२२ २२८८९१, २२५५००, ८८०५०६४०१४, ९९७५८७३५६९, ९७३०३१०६८३ वर संपर्क साधावा असे आवाहन क्रीएटिव्ह इंग्लिश अकॅडमीच्या वतीने करण्यात आलेले आहे. प्रास्ताविकात रोजमेरी धुदाट यांनी अकॅडमीची माहिती दिली. संचालन बेझील किणगी यांनी केले. सुप्रिया किणगी यांनी आभार मानले.
Creative English Academy
क्रीएटिव्ह इंग्लिश अकॅडमी
सन्माननीय महोदय / महोदया, Monday, June 11, 2012
सप्रेम नमस्कार, या पत्राद्वारे आपल्याशी संभाषण करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी स्वत:ला धन्य मानतो. बुलढाणा जिल्हयातील जामगाव या एका लहान खेडे गावात शेतकरी परिवारात माझा जन्म झाला. सुरुवाती पासूनच मला अभ्यास करण्या कडे माझा कल होता. इयत्ता १२ वी च्या परीक्षेत मी अमरावती विभागातून गुणवत्ता यादीत नाव मिळवले तेव्हा संपूर्ण जिल्हा भर माझा गुण गौरव व कौतुक सोहळा झाला आणी त्या मधूनच मला इंग्रजी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळाली.
माझे मोठे बंधू सुनील यांच्या परिचयाचे चर्च पाळक व प्रसिद्ध इंग्रजीचे अभ्यासक सिलास साळवी यांच्या कडे इंग्रजी शिकण्याचे धडे घेतले. पुढे शिक्षणाचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या पाचगणी येथील कॅम्ब्रिज विद्यालयात दाखल झालो तेथेच राहून मला माझ्या इंग्रजीचा पाया मजबूत करण्या साठी मोठी मदत झाली, शिवाय कॅम्ब्रिज विद्यालय, पाचगणी येथे सहाय्यक शिक्षकाची नोकरी करत असतानाच पत्राचार द्वारा शिक्षण शास्त्रातील पदविका प्राप्त केली.
माझ्या लग्नानंतर २००५ पासून जयसिंगपूर येथे स्थाईक झालो, माझ्या कडे असलेल्या इंग्रजी संभाषणाचे कौशल्य बघून अनेक लोकांनी आम्हाला इंग्रजी शिकवा अशी विनंती केली, त्याच दरम्यान मी माझ्या पत्नीच्या सह जयसिंगपूर येथे काही नवीन करता येते का? याचा शोध घेत होतो... व त्यातूनच इंग्रजी संभाषणाची गरज लक्षात घेवून या अकादमीची सुरुवात झाली आज पर्यंत शेकडो व्यक्तीना यामधून लाभ मिळाला या मध्ये डॉक्टर, वकील, शिक्षक, गृहिणी, विद्यार्थी यांच्या समावेश आहे. या कमी माझ्या पत्नीच्या उत्तम इंग्रजीचा मला फायदा झाला. सामाजिक बांधिलकीचा विचार करून आमच्याकडे गरीब व गरजू मुलासाठी मोफत शिकवणीची सोय आहे.
आपल्या संस्थे मधील कर्मचार्यांना मी उत्तम प्रकारे इंग्रजी शिकाऊ शकतो, इंग्रजी शिकण्याचा भक्कम पाया या नावाचे हमखास इंग्रजी शिकण्यास मदत करणारे पुस्तक मी लिहिले असून लवकरच ते प्रसिद्ध करत आहोत. इंग्रजी शिकण्याचा संपूर्ण अभ्यास क्रम हा संगणकावर तयार केलेला असून त्यामुळे इंग्रजी शिकणार्या व्यक्ती च्या क्षमते काही प्रमाणात बदल करणे सहज शक्य आहे. सध्या सोप्या व सरळ पद्धतीने कमीत कमी वेळेत मी अगदी सहज पणे इंग्रजी शिकवू शकतो, इंग्रजी शिकवणे हा माझा आता एक छंद झाला आहे. आपणास जर आपल्या कर्मचार्या साठी इंग्रजी शिकण्याचे प्रशिक्षण हवे असेल तर कृपया आम्हाला तसे कळवावे, जेणेकरून या बाबतचा डेमो लेसन आम्ही आपणास पूर्वनियोजित वेळ ठरवून दाखवू, जर आपणास तो आवडला तर आमच्या शिकवणी शुल्क व अन्य नियम / अटी बाबत प्रत्यक्ष्य चर्चा करू.
· मातृभाषेचा अभिमान बाळगावा मात्र, ज्ञानभाषा इंग्रजी काळाची गरज असल्याने ती प्रत्येकाने आत्मसात करणे आवश्यक आहे. काळानुरूप बदल स्वीकारणारेच स्पर्धेत टिकू शकतात. भाषेचा फाजील अभिमान न बाळगता शैक्षणिक दृष्टय़ा इंग्रजीचे जागतिक महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे. मराठीचा अभिमान असावा. चांगले मराठी येण्यासाठी अवांतर वाचनही असावे. मात्र, जगाची ज्ञानभाषा इंग्रजी असल्याने इंग्रजीचे महत्त्व नाकारून चालणार नाही. त्यासाठी इंग्रजी व मराठीचे रोज एक उत्तम वर्तमानपत्र वाचणे आवश्यक आहे. सद्यस्थितीला प्रत्येक क्षेत्रात संकुचित वृत्तीचे नेतृत्व बहुसंख्येने दिसून येते. युवावर्गाने प्रादेशिक, भाषक आणि धार्मिकवादात गुंतून न राहता शिक्षणाच्या माध्यमातून उत्कर्ष साधणे आवश्यक आहे. इंग्रजी हि आज काळाची गरज आहे हे आपण सर्व जाणतो. आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलो तरी इंग्रजीचे महत्व व गरज हि न टाळता येण्यासारखी गोष्ट आहे. केवळ इंग्रजीचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आज आपले कित्येक मराठी तरुण क्षमता असूनही इतरांच्या मागे पडत आहेत
· मराठीचा वृथा अभिमान न बाळगता इंग्रजी काळाची गरज असून तिचा अभ्यास आवश्यक आहे. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षाच नाकारल्याने स्पर्धा संपुष्टात आली असली तरी विद्यार्थ्यांना ऐनवेळी अभ्यास करण्यापेक्षा नियमित अभ्यासावर भर द्यावा लागेल. विपरित परिस्थितीवर मात करून अनुकूल परिस्थिती निर्माण करणारा खरा हुशार असतो. जयसिंगपूर मधील विद्यार्थ्यांनी यापूर्वीही विविध स्पर्धा परीक्षांमध्ये चुणूक दाखवली असून यापुढे त्यांनी या क्षेत्रात बहुसंख्येने यश संपादन करणे आवश्यक आहे.
· क्रीएटिव्ह इंग्लिश अकॅडमी जयसिंगपूरच्या वतीने ४५ दिवसाचा इंग्लिश स्पिकिंग कोर्स चालवण्यात येतो. सध्याच्या युगात इंग्रजी बोलता येणे गरजेचे असलेने तज्ञ मार्गदर्शकाच्या मार्गदर्शना खाली हा कोर्से आयोजित करण्यात येतो. शहरातील हायस्कूल व महाविद्यालयातील विद्यार्थी, खाजगी व सरकारी कार्यालयातील कर्मचारी, गृहिणी, व्यापारी, आणी विविध उद्योगा मधील सर्वासाठी हा कोर्से उपउक्त आहे. सार्वजनिक समारंभ, मुलाखती, तसेच छोट्या मोठ्या मिटिंग साठी आवशक असणार्या दैनंदिन इंग्रजीची तयारी या कोर्से मधून करण्यात येते. महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यास हिंदीला पर्याय नाही आणि देशाबाहेर गेल्यास इंग्लिश ला पर्याय नाही. इंग्रजी अभ्यासताना मराठी पण शिका. चीनमध्ये आता इंग्रजी जोरदारपणे शिकताहेत. कारण चीनला समजले इंग्रजीचे महत्व. महाराष्ट्रतात इंग्लिश नसल्याने मराठी मुलांचे फार नुकसान झाले हे वास्तव आहे, पण त्यास उशीर झाला आहे. देशात व जगात पुढे जायचे तर इंग्लिश हवेच. मराठीतूनही स्पर्धात्मक परीक्षा देता येतात हे जरी वास्तव असले तरी त्यास मयार्दा आहेत. अमेरिकेत शिकायचे असल्यास इंग्रजीची परीक्षा द्यावी लागते जयसिंगपूर मध्ये शिकायचे असल्यास कच्चे मराठीपण चालते. सिंग, वर्मा, प्रसाद, शर्मा,पांडे सचिवालयात / मंत्रालयात का आले तर केवळ इंग्रजीमुळे… परंतु खरा प्रश्न हा मराठी शाळांमधील निकृष्ट दर्जाच्या इंग्रजीच्या शिक्षणाचा आहे.
· भाषेचा विकास होण्यासाठी ती व्यापार, व्यवहार आणि ज्ञानाची भाषा बनावी लागते. भारतीय भाषा या कसोटीवर कमी पडल्यामुळे इंग्लिशला पर्याय बनू शकल्या नाहीत. चीन / जपान येथील परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. मोनो टोनस कल्चर असलेल्या देशात एकच भाषा असते व त्या मुळे प्रगती च्या मार्गातला सगळ्यात मोठा अडसर दूर होतो. भारतामध्ये देशात शेकडो भाषा समूहा जाती पंथ आहेत. येथे इंग्लिश ला पर्याय नाही.
· ज्ञान आणि तंत्र ज्ञानाधारित युगात इंग्रजीची भूमिका खूप महत्वाची आहे. शिक्षण संस्थानी आपल्या विद्यार्थांना सर्वोच्च ज्ञान देत असताना विद्यार्थ्याची विषणात्मक शक्ती जागृत केली पाहिजे व त्यांना इंग्रजीचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे. सावित्री माईंनी थोडेच परंतु अत्यंत परखड लेखन केले आहे. १५० वर्षापूर्वीच त्यांनी इंग्रजीचे महत्व ओळखले होते. ते पटवून सांगताना सावित्री माई लिहितात ….
इंग्रजी माउली ! इंग्रजी वैखरी !!
शूद्रांना माउली ! मनोभावे !!
इंग्रजी माउली !
तोडते पशुत्व !!देई मनुष्यत्व !
शुद्रलोका !!इंग्रजी शिकुनी !
जातीभेद मोड !!भटजी भारुडा ! ऐकुनिया !!
शूद्रांना माउली ! मनोभावे !!
इंग्रजी माउली !
तोडते पशुत्व !!देई मनुष्यत्व !
शुद्रलोका !!इंग्रजी शिकुनी !
जातीभेद मोड !!भटजी भारुडा ! ऐकुनिया !!
· त्याच प्रमाणे इयता दुसरी पासून दहावी पर्यंत च्या मुला - मुली साठी इंग्रजी करसीव्ह रायटिंग वर्ग आणी इंग्रजी ग्रामर वर्गाचे आयोजन करण्यात येते, प्रत्येक क्लास साठी माफक शुल्क असते. सोप्या पद्धतिने ग्रामरचे अध्यन, परीक्षेत येणारे सर्व ग्रामर, लेटर रायटिंग, स्टोरी रायटिंग, इत्यादी ची तयारी करून घेतली जाते. इंग्रजी शब्द समूहाची योग्य वाढ करण्या साठी गोष्ठीची पुस्तके दिली जातात. इंग्रजी बोलण्याचा भरपूरसराव करून घेतला जातो. महिलासाठी व नोकरदारा साठी स्वतंत्र वर्गाची सोय आहे. इंग्रजी विषयाची आवड निर्माण करण्यासाठी डिजिटल बोर्ड व डिजिटल पेन चा वापर करणारी जयसिंगपूर मधील पहिली व एकमेव संस्था ही या अकॅडमीची काही ठळक वैशिष्टे आहेत.
· आमच्या अकादमी संदर्भात वर्तमान पत्रात प्रसिद्ध आलेल्या काही बातम्या / लेख व जाहिराती च्या प्रती आपल्या माहितीसाठी सोबत जोडल्या आहेत. कृपया त्या पहाव्यात आपणास जर काही प्रश्न अथवा शंका असल्यास आपण आमच्याशी संपर्क साधू शकता.
राज धुदाट (पाटील) कार्यकारी संचालक - Creative English Academy क्रीएटिव्ह इंग्लिश अकॅडमी